कोजागिरी

“अप्राप्य सौंदर्य आणखीन सुंदर भासत असावं” विजू स्वतःशीच म्हणाला. “अजूनही तिच्या प्रेमात आहेस तर” कोणीतरी म्हणालं तसं विजूने दचकून पाहिलं. आज कोजागिरी पौर्णिमा. कॉलनीतले आबालवृद्ध गच्चीत जमले होते, वार्षिक छोटेखानी गेटटुगेदर साठी. मसाला दूध आणि सुकी भेळ. आयुष्यात काहीही बदलो पण ह्या गेटटुगेदरचा मेनू आजवर तोच होता. सोबत गप्पांचे फड, गाण्याच्या भेंडया आणि dumb charades. […]

Read more "कोजागिरी"

धागा

तिसरा ब्लाऊज बिछान्यावर फेकत नेहा ओरडली. “Shit! तिघांपैकी एकही ब्लाऊज बसत नाहीये.” दाढी करता करता अरुणने बाथरूममधून म्हटलं “तुझ्याकडे इतके ब्लाऊज आहेत, फक्त हे तीन का घेऊन बसलीयेस?” “कारण ह्या साडीवर हेच तीन ब्लाऊज आहेत. आईने गेल्या दिवाळसणाला घेतली होती ही साडी मला. तिनेच मोठया हौसेने आमच्या टेलरकडून स्लीव्हलेस, लॉन्ग आणि शॉर्ट स्लीव्ह्सचे ब्लाऊज शिवून […]

Read more "धागा"

उलगडा

“ऐsss गुलबदन ऐsss गुलबदन फुलोंकी महक काटोन्की चुभन तुझे देखके कहता हैं मेरा मन कहीं आज किसीसे मोहोब्बत ना हो जाए कहीं आज किसीसे मोहोब्बत ना हो जाए” रफीच्या आवाजात शम्मी कपूरचा प्रोफेसर रविवार सकाळच्या रंगोली कार्यक्रमात ऐन रंगात आला होता. शामरावांचे कान गाणं ऐकण्यात तल्लीन झाले होते आणि मन बाल्कनीतल्या कुंडीतल्या कढीपत्त्यात. कुठवर कीड […]

Read more "उलगडा"

सिम्बायोसिस

डिलिव्हरीनंतर तीन महिन्यानंतर ती घराबाहेर पडली होती. काही पेंडिंग कामं, डॉक्टरांकडे चेकअप. दोन तासांनी घरी परत येणार होती. पण कामं करत करत तीन तास उलटून गेले होते. दोन तासांत परत येईन म्हणून दूध पंप करण्याची गरज नाही असं वाटून तिने सोबत पंपही घेतला नव्हता. ऊर भरून आला होता. घरी पोहोचायला आणखीन तासभर लागणार होता. रिक्षा, […]

Read more "सिम्बायोसिस"

ट्रॅप

“कॉक्क… कॉ कूsss…कॉक्क… कॉ कूsss…कॉक्क… कॉ कूsss” मऊ मऊ रजईतून हात लांबवला गेला आणि बेडच्या साईड टेबलवरच्या फोनचा अलार्म स्नूझ केला गेला. “लग जा गले के फिर ये हसीं रात हो ना होsss” फोनमधून आवाज आला आणि ह्यावेळी मऊ मऊ रजईतून हात आणि चेहरा दोन्ही बाहेर आले. मीराच्या अत्यंत आवडत्या गाण्याची रिंगटोन तिनेच मुद्दामून ठेवली […]

Read more "ट्रॅप"

विंडो

दोन्ही बाळं बेंबीच्या देठापासून ओरडत रडत होती. हे असं झालं की आईच्या जीवाची घालमेल होते. कुणाला शांत करायचं आणि कुणाला रडत ठेवायचं हा निर्णय सोप्पा नसतो. मांडीवर एकाला घेतलं तरी अपराधी भावनेने ओतप्रोत डोळे दुसऱ्या बाळाकडेच पाहत असतात. तिने दोघांकडे पाहिलं. एकाला तीन तासांपूर्वी दूध पाजलेलं तर दुसऱ्याला पावणेतीन तासांपूर्वी. पंधरा मिनिटांच्या फरकाने बाळांना थोडीच […]

Read more "विंडो"

केयरटेकर

मध्यरात्रीच्या बारावर काटा सरकला आणि कुकु क्लॉकमधला कुकु खिडकी उघडून बारावेळा “कुsssक्कू” करून आत पळाला. तेवढ्यात एक व्हायोलिनचा म्युझिक पीस वाजला आणि त्या तालावर कुकुच्या खिडकीच्या वरच्या कप्प्यात उभ्या चार जोडप्यांनी गिरक्या घेत बॉलडान्स केला. म्युझिक संपलं तशी ती जोडपी जागच्या जागी थिजली. बंगल्यात पुन्हा स्मशानशांतता पसरायचा अवकाश, आतून चावीसदृश काहीतरी फिरवलं गेलं आणि खटकन […]

Read more "केयरटेकर"

उत्तर

आकाश किती वेळ कीबोर्डवर बोटं बडवत होता ह्याचं भान त्याला राहिलं नव्हतं. स्क्रीनकडे एकटक पाहत, झालेल्या एस्कलेशनला एक्सप्लनेशन मेल लिहीत त्याची लागलेली तंद्री शेवटी रग लागलेल्या मानेने मोडली. ती रग जावी म्हणून डोकं इथे तिथे करताना त्याचं लॅपटॉपमधल्या घड्याळाकडे लक्ष गेलं. दुपारचे तीन वाजले होते. “अरे, आज वेळ चुकली आपली!” न चुकता, दर दिवशी दुपारी […]

Read more "उत्तर"

कातरवेळ

“ही संध्याकाळची वेळ. मनात कुठेतरी सतत पाल चुकचुकत असते. सगळं ठीक आहे ना, सगळे ठीक आहेत ना, मनात सारखा विचार येत राहतो. हृदय वॉशिंग मशीनच्या ड्रायरसारखं धडधडत राहतं. ही संध्याकाळची वेळ अशी का असते? नकोशी वाटते ही वेळ. शुभंकरोतीत “इडा पीडा टळो” म्हणतात. मी तर म्हणते ही संध्याकाळची वेळच टळो.” तिच्या मनातले विचार. तेवढ्यात दारामागून […]

Read more "कातरवेळ"

फ्रीडम

“एखाद्या बीचवर तुझ्या हातात हात, खांद्यावर डोकं, ऐकू येणारी फक्त समुद्राची गाज आणि हृदयाची स्पंदनं…यह समा बस यहीं ठहर जाए” “Wow” “आता तुझी फँटसी सांग” “एखाद्या रेस्टॉरंटमध्ये कँडल लाईट डिनर, वाईनचे ग्लास, तुझ्या डोळ्यांत माझे डोळे, आजूबाजूच्या जगाचा पडलेला विसर, अगदी वाईनचाही” “ओहो” “मग तू माझ्या डोळ्यांत बघणारे डोळे हटवून म्हणतेस, चियर्स करायचं?” “अँड आय […]

Read more "फ्रीडम"