चमक

पहाटे साडेपाचचा अलार्म वाजला तशी ती उठली. अलार्म स्नूझ करून दहा मिनिटं आणखीन झोपायचा मोह होत होता. पण नंतर घाईगडबड होईल म्हणून नाईलाजाने पांघरूण बाजूला सारत ती उठली. लेकीच्या खोलीत गेली. लेक पोटावर, पार्श्वभाग वर करून आणि दोन्ही हात पोटाखाली घेऊन झोपली होती. आईच्या पोटात बाळाची असते तशी पोझ. असं लेकीला पाहिलं की तिच्या रंध्रारंध्रातून […]

Read more "चमक"

पुरेसं

गार्गी घरात उड्या मारत पळत होती. स्वतःच्या नादात, काहीतरी पुटपुटत आणि चेहऱ्यावर विलक्षण खुशीचे भाव. मिहीर ब्रेकफास्ट करत तिच्याकडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावरची खुशी मिहिरच्या चेहऱ्यावर परावर्तीत होत, त्याने नेहाला विचारलं. “हिला काय झालंय? एवढी खूश का आज?” “मी सकाळी सुपरमार्केटहून आणलेल्या सामानात तिने आईस्क्रीमचा डबा पाहिलाय.” नेहा हसत म्हणाली. “तिचा घसा खराब आहे, अजून […]

Read more "पुरेसं"

ऑनलाईन

“भूत जेव्हा दिसत नाही तेव्हाच जास्त घाबरवतं. कुठे झक मारली आणि हा सिनेमा पाहिला.” तिच्या मनात विचार आला. घरचे चार दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. घरच्यांना भुताखेतांच्या सिनेमात रस नव्हता, पण तिला होता. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीवर आधारित एक पिक्चर तिला कधीचा पाहायचा होता, तो तिने आज पाहिला. ते ही रात्री. आता मध्यरात्रीचे दोन वाजले होते आणि तिचे […]

Read more "ऑनलाईन"

रूपं

सकाळी उठून तो घराच्या अंगणातल्या बागेत फिरत होता. गुलाबाच्या झाडांना काही गुलाब येताना दिसत होते. काही कळ्या, काही उमलत्या कळ्या आणि एक गुलाब आजच पूर्ण उमलला होता. त्याने गुलाबाच्या अगदी जवळ जाऊन त्याला निरखून पाहिलं. टपोरा, केशरी, सुगंधी गुलाब. सकाळचं दव त्याच्या अंगावर पडून त्याची खूबसुरती आणखीन खुलवतेय ह्याबद्दल अनभिज्ञ गुलाब. आपण किती सुंदर आहोत […]

Read more "रूपं"