श्रीमंती

सकाळी सहाच्या अलार्मने तिला उठवलं. सहा वाजलेत माहित असूनही तिने हात लांबवून मोबाईल फोन हातात घेऊन डोळे किलकिले करत वेळ पाहिली. “पाच वाजले असते तर आणखीन एक तास झोपायला मिळालं असतं” रोजचा फक्त तो एक सहाचा अलार्म फोनमध्ये असूनही तिच्या मनात विचार आला. दहा मिनिटं स्नूझ करून सहा दहाला उठते म्हणून तिने अलार्म दहा मिनिटं […]

Read more "श्रीमंती"

स्ट्रॉंग

रविवार सकाळचे नऊ वाजले असतील. मयूर नुकताच त्याचा व्यायाम आटपून चाळीच्या बाल्कनीत उभा होता. सहा फुटाच्या आतबाहेरची उंची आणि व्यायामाने आणखीन कमावलेली मूळची धिप्पाड शरीरयष्टी. बनियानवर असल्यामुळे आणि व्यायामामुळे दंडावर आलेल्या घामामुळे शरीर टिचभर जास्त पिळदार दिसत होतं. शेजारच्या वसूवहिनीच्या घरचं दार उघडून तिथल्या फिरत्या टेबलफॅनचा वारा आला तसा मयूर सुखावला. आजूबाजूला गजबज होती. कोणी […]

Read more "स्ट्रॉंग"

फाईव्ह स्टार

आपल्याकडच्या किल्ल्यांनी सरनाईकांच्या घराचं दार उघडून, घामाघूम झालेली मंदा आत आली. सकाळचे अकरा वाजले होते. आज नेहमीसारखी नऊच्या आत काम आटपून जायची घाई नव्हती कारण दोनतीन दिवसांसाठी मंडळी बाहेरगावी गेली होती. घरात मिस्टर आणि मिसेस सरनाईक आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा कुणाल, असं त्रिकोणी कुटुंब. मिस्टर सरनाईक कुठल्याश्या बँकेत होते. मिसेस सरनाईक ट्युशन घ्यायच्या, बरोबर […]

Read more "फाईव्ह स्टार"

निमित्त

ती सटासट भेंडी कापत होती. “भांडण करायला निमित्त हवंय तुला असं वाटतंय” तो म्हणाला. तीनचार तासांपूर्वी अगदी नॉर्मल दिवस सुरु होता. आज सुट्टीचा दिवस. निशा उठली. आदित्य आधीच उठला होता त्यामुळे चहा तयार होता. तिने पटापट ब्रेकफास्ट बनवला. आज आयुषला घेऊन मॉल मध्ये जायचं होतं. तिकडे गेमझोनमध्ये मुलांसाठी नवीन गेम्स आलेत ही खबर लागल्यापासून त्याने […]

Read more "निमित्त"

Yellow

“मॅम, तुम्ही पिवळ्या रंगाचा ड्रेस नाही घातलात तो?” हे वाक्य कानावर पडलं तसं तिने लॅपटॉपमधून डोकं काढून कॅबिनच्या दाराकडे पाहिलं. ओपन कॅबिनच्या बाहेरून अर्धी आत डोकावत एक मुलगी विचारत होती. तिचं डोकं, मन अजूनही त्या लॅपटॉपवर खरडत असलेल्या टॉपिककडे असल्यामुळे त्या मुलीकडे नजर असली तरी खांद्यावरचा प्रोसेसर त्या दिशेने काम करत नव्हता. अंमळ टाईम डिलेनंतर […]

Read more "Yellow"

ब्ल्यू

“मंजिरीsss” अशी आर्त हाक मारत अभय आज मध्यरात्री पुन्हा दचकून उठला. संपूर्ण शरीर घामाने डबडबलेलं. तो बिछान्यावर उठून बसला. गळ्यातलं जानवं सरळ केलं आणि पाणी प्यायला ठेवलेली साईड टेबलवरची बाटली हाती घेतली. ती रिकामी होती. पाणी भरण्यासाठी तो किचनमध्ये गेला. माठाच्या नळातून बाटली भरताना विचारचक्र सुरु झालं. आजचा तिसरा आठवडा आणि तेच स्वप्न. मंजिरी म्हणजे […]

Read more "ब्ल्यू"

कोजागिरी

“अप्राप्य सौंदर्य आणखीन सुंदर भासत असावं” विजू स्वतःशीच म्हणाला. “अजूनही तिच्या प्रेमात आहेस तर” कोणीतरी म्हणालं तसं विजूने दचकून पाहिलं. आज कोजागिरी पौर्णिमा. कॉलनीतले आबालवृद्ध गच्चीत जमले होते, वार्षिक छोटेखानी गेटटुगेदर साठी. मसाला दूध आणि सुकी भेळ. आयुष्यात काहीही बदलो पण ह्या गेटटुगेदरचा मेनू आजवर तोच होता. सोबत गप्पांचे फड, गाण्याच्या भेंडया आणि dumb charades. […]

Read more "कोजागिरी"

धागा

तिसरा ब्लाऊज बिछान्यावर फेकत नेहा ओरडली. “Shit! तिघांपैकी एकही ब्लाऊज बसत नाहीये.” दाढी करता करता अरुणने बाथरूममधून म्हटलं “तुझ्याकडे इतके ब्लाऊज आहेत, फक्त हे तीन का घेऊन बसलीयेस?” “कारण ह्या साडीवर हेच तीन ब्लाऊज आहेत. आईने गेल्या दिवाळसणाला घेतली होती ही साडी मला. तिनेच मोठया हौसेने आमच्या टेलरकडून स्लीव्हलेस, लॉन्ग आणि शॉर्ट स्लीव्ह्सचे ब्लाऊज शिवून […]

Read more "धागा"

उलगडा

“ऐsss गुलबदन ऐsss गुलबदन फुलोंकी महक काटोन्की चुभन तुझे देखके कहता हैं मेरा मन कहीं आज किसीसे मोहोब्बत ना हो जाए कहीं आज किसीसे मोहोब्बत ना हो जाए” रफीच्या आवाजात शम्मी कपूरचा प्रोफेसर रविवार सकाळच्या रंगोली कार्यक्रमात ऐन रंगात आला होता. शामरावांचे कान गाणं ऐकण्यात तल्लीन झाले होते आणि मन बाल्कनीतल्या कुंडीतल्या कढीपत्त्यात. कुठवर कीड […]

Read more "उलगडा"

सिम्बायोसिस

डिलिव्हरीनंतर तीन महिन्यानंतर ती घराबाहेर पडली होती. काही पेंडिंग कामं, डॉक्टरांकडे चेकअप. दोन तासांनी घरी परत येणार होती. पण कामं करत करत तीन तास उलटून गेले होते. दोन तासांत परत येईन म्हणून दूध पंप करण्याची गरज नाही असं वाटून तिने सोबत पंपही घेतला नव्हता. ऊर भरून आला होता. घरी पोहोचायला आणखीन तासभर लागणार होता. रिक्षा, […]

Read more "सिम्बायोसिस"