विषय खोल आहे

संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास जिन्यातून “फाट फाट” असा बाटाच्या (पांढऱ्या बॅकग्राउंडवर निळ्या पट्ट्यांच्या टिपिकल) स्लिपर्सचा आवाज आला की समजून जायचं की राजू आलाय. तरीही खातरजमा करून घ्यायची असेल तर दार उघडून फक्त नाक बाहेर काढायचं. नाकाला मोहरीच्या तेलाचा उग्र वास आला की १०० टक्के राजूच. राजू इस्त्रीवाला. मोहरीचं तेल म्हणजे सर्टिफाईड भैय्या युपीचा. युपीहून कित्येक वर्षांपूर्वी […]

Read more "विषय खोल आहे"

इच्छा

“आजी, गोष्ट सांग ना.” रात्री झोपताना देविका आणि दर्शनने आजीकडे लकडा लावला. आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी आई, बाबा आणि दोन मुलं आजोळी गावी राहायला आले होते. “अरे गप झोपा रे. दिवसभरानंतर आजी दमलीये. तिला झोपू द्या” आई खोलीत येऊन ओरडली. “असू देत गं. रोज रोज का सांगायला मिळते मला गोष्ट! कुठली गोष्ट ऐकायची आहे?” “हॉरर स्टोरी सांग” […]

Read more "इच्छा"

ट्विस्ट पार्ट 2

“हॅलो… हॅलो…हॅलो” “हॅ..लोsss” “काय गं, कुठे गायब झालीस?” “आं?” “आं मी करायला हवं…छान हसत होतीस आणि मध्येच असा का सूर लावलास?” “कुठे होतो आपण?” “तुझं PMS चं शेड्युल मला माहित असणं म्हणजे जरा अतीच होतंय असं तू म्हणालीस.” “हो आणि तू म्हणालास हो होतंच आहे कारण मी तुझ्या कल्पनेतला आहे, खरा नाही.” *त्याचं गडगडाटी हास्य* […]

Read more "ट्विस्ट पार्ट 2"

ट्विस्ट

“काय करतेस?” “टीव्हीवर चॅनल्स सर्फ करतेय.” “थांब थांब… मी सांगतो…किचन आवरलेलं आहे. रात्री जेवायला मॅगीच तर करायची आहे. सोफ्यावर बसली आहेस. पायांवर मऊ कम्फर्टर आहे. बाजूला स्नॅक्स आहे, मूगडाळ/आलू भुजिया/पोटॅटो चिप्स ह्यापैकी काहीही. रिमोट घेऊन सोफ्यावर बसलीस तर खरी, पण मनात जस्ट एक पाल चुकचुकली की आतल्या रूम्समधले लाईट्स तर चालू नाहीत ना. त्यामुळे ‘चॅक’ […]

Read more "ट्विस्ट"

आपसूक

कधीचा तिच्या डोळ्यात पापणीचा एक केस खुपतोय. पण हाताला लागत नाही. ती कॉफी करायला घेते. आकाशात मळभ दाटून येतं. ती अस्वस्थ होते. ढगांचा गडगडाट सोबत जोराचा पाऊस आणतो. आकाशाचं मन रितं होतंय. तिच्या मनावरचं मळभ आणखीन दाट होतंय. ते पाच…ढगांचा गडगडाट, पाऊस, कॉफी, ती आणि तो. ´आणि´ नंतर आता ´तो´ नाही. आणि चारांत ती मजा […]

Read more "आपसूक"

मॅजिक

“Do you believe in magic?” “Not really” “Do you?” “How can I not believe the spell that your eyes cast on me?” ती लाजली. “शब्दांशी छान खेळतोस तू. रायटर व्हायला पाहिजे होतास.” “कुठे आयटीत गेलो, नाही?” “नाहीतर काय, नाहीतर इतका दूर नसतास माझ्यापासून” ती तोंड वाकडं करत म्हणाली. “आणि तुझ्या जवळ असतो तर शब्दांशी खेळण्यात […]

Read more "मॅजिक"

क्यूपिड

“एक बँड स्टॅन्ड सिंगल” असं म्हटल्यावर कंडक्टर आपल्याकडे पाहून “14 फेब्रुवारी आणि तरीही सिंगल?” मनात म्हणत हसतोय असं त्याला वाटलं. त्याने सुट्टे पैसे देताना कंडक्टरकडे पुन्हा बघितलं तेव्हा तो भास होता हे त्याच्या लक्षात आलं. “च्यायला, हा व्हॅलेन्टाईन्स डे ओव्हरहाईप करून ठेवलाय, उगीचच सिंगल असल्याचं प्रेशर येत राहतं.” त्याच्या मनात विचार आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. […]

Read more "क्यूपिड"

बीज

ती आणि तो एका कॉफी शॉपच्या बाहेर भेटले. तो (हसून): “हाय” ती (हसून): “हाय” “आत जाऊया?” “हो” दोघे कोपऱ्यातलं एक टेबल शोधून बसले जेणेकरून कॉफीशॉपमधल्या गर्दीतही जरा निवांत बोलायला मिळालं असतं. बसल्या बसल्या तो “मी जरा आलोच” म्हणत वॉशरूमकडे पळाला. तिने त्याला पाठमोरं न्याहाळलं. ब्लू जीन्स आणि ब्लॅक शर्ट. जीन्सच्या मागचं लिव्हाईस लेबल. जेल लावून […]

Read more "बीज"

दाग

शनिवारची रात्र. दोघे सोफ्यावर पाय पसरून एकमेकांपासून थोडया अंतरावर बसले होते. त्यांच्यामधलं अंतर त्यांच्या चार वर्षाच्या लेकाने कव्हर केलं होतं. खेळता खेळता आईच्या मांडीवर डोकं आणि बाबाच्या मांडीवर पाय ठेवून स्वारी निश्चिन्त झोपली होती. एखादी मूव्ही बघूया म्हणून टीव्हीचं सर्फीन्ग सुरु झालं. कुठल्याश्या चॅनलवर नुकताच ‘लाईफ इन अ मेट्रो’ सिनेमा लागला होता. दोन डोळ्यांच्या मूक […]

Read more "दाग"

दरवाजा

“आपली पहिली मिठी आठवतेय?” (ज्यूस पिताना त्याला जोरदार ठसका लागतो) (त्याच्या डोक्यावर हलक्या हाताने थोपटत) “कोण आठवण काढतंय बरं?” “तूच… जुन्या आठवणींचा ट्रिव्हिया विचारायला लागलीस की टेंशन येतं मला, माझी मेमरी नाही तुझ्याएवढी चांगली” “टेन्शन मत ले, दिमाग को थोडा ताण देकर देख” (तो विचार केल्यासारखं करून, काही बोलणार त्याच्या आत त्याला थांबवत) “नकोच… ऍक्टिंगही […]

Read more "दरवाजा"