पुढचं पाऊल

दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, संगीताचं अंग आंबून गेलं होतं. कधी काम संपवून बिछान्यावर पडतेय असं झालं होतं. ओटा पुसून, पाणी घेऊन ती बिछान्यावर पडली. तिचा नवरा एव्हाना घोरायला लागला होता. तिने बिछान्यावर अंग टाकलं तेव्हा शरीराचा इंच न इंच दुखत असल्याची तिला जाणीव झाली. कामं तर रोजचीच, पण आज जास्त थकवा जाणवत होता. इतर वेळी […]

Read more "पुढचं पाऊल"

सुरुवात

“ऑफिसच्या मशीनची कॉफी इतकी बकवास असते पण तरीही सोडवत का नाही?” तिने मशीनखालून कॉफी खसकन ओढून घेताना स्वतःलाच मोठ्याने विचारलेला प्रश्न. “Maybe because it’s a ritual that you are used to” ह्या उत्तराने ती दचकलीच. पॅन्ट्रीमध्ये आपल्याशिवाय दुसरं कोणी आहे ह्याची तिला कल्पना नव्हती. तिची दाराकडे नजर गेली. तो पँट्रीच्या दारापाशी उभा होता. नेव्हीब्ल्यू फुलशर्ट, […]

Read more "सुरुवात"

पेरिफरल

„And I thought you loved me“ “So did I” “You have changed. I fell in love with a true blue romantic guy who used to care about my feelings. But now you are a self-centered, rude man” “and you? Haven´t you changed? An ever smiling, happy, bubbly girl is what I saw back then, all […]

Read more "पेरिफरल"

बांध

आज शुक्रवार. रात्रीचे आठ वाजले असावेत. घरात बॉडी स्प्रे, आफ्टरशेव्हचा घमघमाट होता. अमितचे रूममेट्स बाहेर जायच्या तयारीत होते आणि तो लॅपटॉपच्या कीबोर्डवर बोटं बडवत होता. “तू आज भी साथ नहीं चलेगा ना?” एक रूममेट.स्क्रीनवरून नजर हटू न देता अमित “आना तो था. लेकिन बहुत काम है यार”“हां हां पता है, CEO है ना साले तू […]

Read more "बांध"

उडतं पाखरू

पल्लवी कॉलेजला जायची तयारी करत होती. बिछान्यावर ठेवलेल्या, इस्त्रीतल्या पांढऱ्या कुर्त्याकडे पाहत तिने सुस्कारा सोडला. वजन थोडं वाढल्यामुळे, तो कुर्ता अंगात घालताना किंवा गनिमी काव्याने त्या कुर्त्यात शिरताना तिला होणाऱ्या यातनांची तिला आठवण आली. पण आज हाच कुर्ता घालायचा. का? तर त्याला हा कुर्ता आवडतो म्हणून. “कोणी सांगितलं तुला हे? त्याने?” तिच्याच मनाचा दुसरा प्रश्न.“त्याने […]

Read more "उडतं पाखरू"