घास

शहर आणि गावामधल्या एका निर्जन भागात कंपनीच्या एका प्रोजेक्टवर, एक महिन्यासाठी विनोदची बदली झाली. प्रोजेक्टवर असलेल्या मूळ इंजिनियरचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे विनोदला तिथे तडकाफडकी जावं लागलं. त्या इंजिनियरचं घर गावात होतं, प्रोजेक्टवर काम करणारे इतर कामगारही गावातून येत. विनोद काय तो एकटा शहरातला होता, त्यामुळे एक महिन्यासाठी त्याच्या राहण्याची सोय करावी लागणार होती. निर्जन भाग […]

Read more "घास"

सुख म्हणजे नेमकं काय असतं?

सुख म्हणजे नेमकं काय असतं? बाहेर कडाक्याची थंडी पडलेली असावी,माणूस अर्बन असोत ना का पण अंडी गावठी असावीत,नाश्त्याला जमून आलेली गरमागरम अंडा भुर्जी असावी,पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल नाही पण निदान चंद्रकोरेसारखी पोळी असावी,हे निवांत खायला वेळ असावा. सुख म्हणजे नेमकं काय असतं? माझा जन्म, जन्माचं स्थान हे सगळं प्रिव्हिलेज्ड होतं. मुंबईसारख्या शहरात आणि प्रोग्रेसिव्ह विचारांच्या मराठी […]

Read more "सुख म्हणजे नेमकं काय असतं?"

अबोला

त्या दोघांमधला अबोला खूपच बोलका असतो. अख्ख्या घराला माहित असतं त्यांचं झालेलं भांडण, रुसवा-फुगवा आणि अबोला. “मला तुझ्याशी बोलायचं नाही” हे वाक्य एकमेकांना दर कृतीतून सांगायचं असतं. पण सांगता तर येत नसतं. मग फाईल्समधल्या कागदांचा, किचनमधल्या भांड्यांचा, खोलींच्या दारांचा, दारांच्या कड्यांचा, भसकन सोडलेल्या नळाचा चढलेला आवाज येतो मदतीला. त्यांच्या अबोल्याचा एको. जसजसा वेळ जातो, अबोला […]

Read more "अबोला"

जिंदगी गुलजार है

काल रात्री घराजवळच्या सुपरमार्केटला गेले होते. 5 डिग्री तापमान आणि बोचरी हवा. त्यामुळे कांद्यासारखे दोनतीन लेयर्स अंगावर चढवून गेले होते. इथला (हवामानाच्या दृष्टीने) सर्वात वाईट महिना म्हणजे नोव्हेंबर. थंडी चांगलीच पडलेली असते आणि आणखीन तीनेक महिने मुक्कामाला आहे हे ठणकावून सांगत असते पण नोव्हेंबर महिन्यात सर्वात मोठं दुखणं असतं ते म्हणजे सूर्य ऑलमोस्ट न दिसणे. […]

Read more "जिंदगी गुलजार है"

रुटीन

सकाळी तिला फोनमधल्या अलार्मच्या कर्णमधुर आवाजाने जाग आली. अलार्मची ट्यून कितीही लाडकी का असेनात, सकाळी कर्णकर्कशच वाटते. डोळे जेमतेम उघडत तिने माहित असूनही फोनमध्ये किती वाजलेत ते पाहिलं. “दहा मिनिटं आणखीन झोपू का?” रोजचा मोह आणि “नको, नंतर किती तारांबळ उडते माहित आहे ना?” रोजची समजूत. बाजूला लेक आणि नवरा अजूनही साखरझोपेत होते. त्यांना पाहून […]

Read more "रुटीन"

दळणाचा डबा

काही वस्तुंनाही ठराविक ‘पर्सनॅलिटी’ असते आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रोफाईल वृद्धिंगत होत असतो. दळणाचा डबा म्हटलं की ऍल्यूमिनियमचाच डबा डोळ्यासमोर येतो. त्याच्या झाकणाच्याही दोन टोकाच्या तऱ्हा. एक तर सैल बसणारं (त्यामुळे रिस्क नको म्हणून आई दळणाला पाठवताना कानवाल्या कापडी पिशवीत त्याला भरून देणार) किंवा प्रत्येक वेळेस “तू खालून डबा धर, मी झाकण उघडते’ इतकं घट्ट बसणारं, […]

Read more "दळणाचा डबा"

फक्कड

तीसेक वर्षांपूर्वीचा काळ. एक एकत्र राहणारं कुटुंब. घरात रिटायर्ड सासूसासरे, मुलगा आणि सून. त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. अरेंज्ड मॅरेज. एकमेकांना उलगडण्याचा, एकमेकांच्या आवडीनवडी जाणून घ्यायचा काळ. अशातली एक संध्याकाळ. सासूबाई दिवाणखान्यात काहीतरी शिवणकाम घेऊन बसलेल्या असतात. सासरेबुवा तिथेच बाजूला आरामखुर्चीवर सकाळच्या वर्तमानपत्रातली वाचायची राहिलेली पुरवणी वाचत असतात. ती स्वयंपाकघरात कणिक मळत असते. सासूबाईंची पोझिशन […]

Read more "फक्कड"