शाप

केदार एका जुनाट, कळकट ढाबावजा उपाहारगृहाच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर बसून चहा पीत होता. दुपारचे बारा वाजले होते. घरून निघून त्याला पाच तास झाले होते. कुठल्यातरी गावापाशी एक छोटं जंगल होतं जिथे एका दुर्मिळ जातीचा पक्षी पाहण्यात आला होता, त्याचे फोटो काढायला त्याला त्याच्या मॅगझीनने पाठवलं होतं. खरं पाहता त्याचा आज इथे यायचा मूड नव्हता कारण […]

Read more "शाप"

कुंबळंगी नाईट्स

तुम्ही by road एका लंब्या प्रवासाला निघता. वाटेत ब्रेक घेऊन मॅक्डोनाल्ड्स, केएफसी, कामत किंवा आणखीन एखाद्या ब्रँडेड, ऐकीव रेस्टोरंटमध्ये खाऊ असा बेत असतो. पण सडकून भूक लागलेली असते, वाटेत एखादा साधा ढाबा लागतो आणि माहितीचं रेस्टोरंट येईपर्यंत धीर नसतो. म्हणून तुम्ही त्या ढाब्यामध्ये जेवायला जाता. तिथलं जेवण ताजं आणि इतकं रुचकर असतं की इथे जेवलो […]

Read more "कुंबळंगी नाईट्स"

फुलपुडी आणि ऑर्किड्स

सुधीरचं लग्न होऊन जेमतेम दोन महिने झाले होते. ऑफिसमधून घरी येताना स्वारी खुशीत असायची. आज ऑफिसहून परत येताना वाटेत बुकेवाल्याकडून त्याने बायकोसाठी म्हणजे मीरासाठी तिची आवडती ऑर्किड्स फुलं घेतली. मीराला फुलदाणी ताज्या फुलांनी सजवायला आवडतं, ती खुश होईल त्याच्या मनात विचार आला. बाजूलाच बसणाऱ्या नेहमीच्या हारवालीकडून देवासाठी (खऱ्या अर्थाने आईसाठी) फुलपुडीही बांधून घेतली. मीराला भेटण्याच्या […]

Read more "फुलपुडी आणि ऑर्किड्स"

लोभस

युरोपातली हिवाळ्यातल्या एक बोचऱ्या थंडीची संध्याकाळ. ते दोघे गायनेकॉलॉजिस्टच्या क्लिनिकमधून बाहेर पडतात. आज ९ महिने पूर्ण झाल्यानंतरचं चेकअप झालेलं असतं. डॉक्टरच्या “बाळाची वाढ पूर्ण झालेली आहे आणि आता ते कधीही बाहेर यायची शक्यता आहे, सो रिलॅक्स अँड एन्जॉय” ह्या वाक्याने दोघेही सुखावून गेलेली असतात. तो तिला विचारतो “भूक लागलीये. काय खायचंय?” त्याला आवडत नाही हे […]

Read more "लोभस"