डेस्टिनेशन जर्मनी – भाग सहा – जर्मनीत जायची पूर्वतयारी

मला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न “मी जर्मनीत मायग्रेट होऊ का? तुला काय वाटतं?”. माझं उत्तर “ते मी कसं सांगू?” मला जर कोणी विचारलं “मी गुलाबजामून खाऊ का?” तरीही माझं उत्तर तेच असेल, कारण तो खाण्यामागची तुम्ही भावना, इच्छा, अपेक्षा काय आहे ते मी कसं सांगू? आणि इथे प्रश्न तर मायग्रेट होण्याचा […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग सहा – जर्मनीत जायची पूर्वतयारी"

डेस्टिनेशन जर्मनी – भाग पाच – जर्मनीत डेकेयर

माझ्या मते बाळाचा जन्म होताच आईच्या शरीरात लॅक्टेशन म्हणजे दुधाच्या ग्रंथींसोबत आणखीन एक ग्रंथी वाहू लागते. ती म्हणजे गिल्ट म्हणजे अपराधीपणाची ग्रंथी. दूध नीट येत नाहीये म्हणून गिल्ट, बाळ दूध नीट पीत नाहीये – गिल्ट, बाळ सारखं दूध मागतंय म्हणजे प्रत्येक वेळीस पोट भरत नसेल – गिल्ट, बाळ झोपत नाहीये – गिल्ट, बाळ खूप झोपतंय […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग पाच – जर्मनीत डेकेयर"

डेस्टिनेशन जर्मनी – भाग चार – जर्मनीत प्रेग्नन्सी आणि बाळाचा जन्म

बाळाचं आगमन हे कोणत्याही जोडप्याचं आयुष्य बदलून टाकतं. खरं पाहता बाळाची चाहूल लागताच हळूहळू बदल सुरु होतो. रोजच्या धबडग्यात होणारी आई स्वतःची कधी नव्हे इतकी काळजी घ्यायला लागते, होणारा बाबाही हळूहळू ‘जबाबदारपणे’ वागू लागतो. भारतात असलात तर होणाऱ्या आजी, आजोबा, मावशी, काका, आत्या, मामा इत्यादी इत्यादी कोडकौतुक करणाऱ्यांची यादी लांब असते. पण भारतापासून लांब राहणाऱ्या […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग चार – जर्मनीत प्रेग्नन्सी आणि बाळाचा जन्म"

डेस्टिनेशन जर्मनी – भाग तीन – जर्मनीत टॅक्सेस आणि इंश्युरन्स

इथे ‘कर’ माझे जुळती🤭. कोटी आहे इथे. जर्मनीतल्या टॅक्स सिस्टिमसमोर हात जोडले जातात आणि इथे टॅक्सची टोटलही लागते. इथलं टॅक्स स्ट्रक्चर समजायला थोडा वेळ लागतो. आपल्याकडे नोकरदारांसाठी सॅलरीचे टॅक्स स्लॅब्स असतात. इथे प्रकार वेगळा आहे. तुम्हाला खर्चासाठी, जीवनोपयोगी गोष्टींसाठी किती पैसे लागतात ह्यावर तुमचा टॅक्स अवलंबून आहे. इथे प्रत्येक नोकरदारासाठी एक टॅक्स क्लास असतो आणि […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग तीन – जर्मनीत टॅक्सेस आणि इंश्युरन्स"

डेस्टिनेशन जर्मनी – भाग दोन – जर्मनीत घर

म्हणतात की लग्न करावे पाहून आणि घर पाहावे बांधून. जर्मनीत ही म्हण „घर पाहावे भाड्याने घेऊन“ अशी सुधारावी लागेल. गेल्या ६ वर्षांत जर्मनीत ३ शहरं आणि ६ घरांत राहिल्यानंतर हा अनुभव म्हणजे द्राविडी प्राणायाम असतो ह्यावर माझं शिक्कामोर्तब आहे. आम्ही जर्मनीत २०१३ साली राहिलो ते शहर म्हणजे Friedrichshafen. तिथे घर शोधायला लागलं नाही कारण मी […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग दोन – जर्मनीत घर"

डेस्टिनेशन जर्मनी – भाग एक – जर्मनीत नोकरी

साल २०१२. ह्या साली जगबुडी होणार होती. ती झाली नाही. पण आमचं लग्न झालं (इथे हशा आहे). २०१२ साल हे माझ्या आयुष्यातलं बऱ्याच घडामोडींचं साल. फेब्रुवारीत मी मुंबईतली इंडो जर्मन चेंबर्स ऑफ कॉमर्स मधली नोकरी सोडली होती. जर्मन भाषेची C2 लेव्हल (लिटरेचर जर्मन म्हणू शकतो) शिकत होते. बँगलोरला नोकरी शोधत होते कारण(होणारा) नवरा तिथे होता […]

Read more "डेस्टिनेशन जर्मनी – भाग एक – जर्मनीत नोकरी"