मुगॅम्बो खुश हुवा

मिस्टर इंडिया हा चित्रपट किती वेळा पाहिलाय ह्याचा काउंट नाही. अत्यंत आवडलेला चित्रपट. एक गॅजेट हातावर बांधून माणूस दिसेनासा होतो आणि त्याला अपवाद केवळ लाल काच. काय भारी वाटलं होतं ते लहानपणी पाहताना. खूप काळानंतर पुन्हा पाहिल्यावर मात्र मुगॅम्बोचे काही सीन्स पाहून तुडुंब हसायला आलं. त्यातला हा एक. डागा (शरत सक्सेना) आणि तेजा (अजित वाच्छानी) […]

Read more "मुगॅम्बो खुश हुवा"

रोमान्स

मनीष आणि प्रिया. एक पस्तिशीच्या वरचं आणि चाळीशीच्या आतलं मध्यमवर्गीय दांपत्य. दोघेही बँकेत नोकरीत. मनीषचं लाडाचं नाव बंडू. तर बंडू आणि प्रिया आणि त्यांचा दहा वर्षांचा मुलगा चैतन्य उर्फ ज्युनियर बंडू असं छान, छोटं कुटुंब. शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि ज्युनियर बंडू आजोळी पळाला. त्यामुळे घरात बंडू आणि प्रिया दोघंच. रविवारचा दिवस होता. त्यामुळे उठाउठी […]

Read more "रोमान्स"

प्रिटी वूमन

काही चित्रपट, काही नाही बरेच चित्रपट हे औषधांसारखे असतात. त्यांना एक्सपायरी डेट असते. कधीकाळी खूप ´एन्जॉय´केलेले,  ´सही´ वाटलेले चित्रपट आता एक नजर देखील बघवत नाहीत. आणि “मला असले चित्रपट आवडायचे?” असा विचार मनात येऊन स्वतःचंच हसू येतं. पण काही सिनेमे एव्हरग्रीन असतात. किंवा चांगल्या प्रतीच्या वाईन सारखे असतात “the older the better “. असा एखादा सिनेमा […]

Read more "प्रिटी वूमन"

ओळख

संध्याकाळचे ६.४५ वाजले होते. ऑफिसमधून घरी जायला बसची वाट बघत ती बसस्टॉपवर उभी होती. तेवढ्यात वधूवरसूचक मंडळातून फोन आला. “नाही. मला इंटरेस्ट नाहीये. पुन्हा फोन करू नका” असं तावातावाने, नाही तावातावाने नाही, निर्विकारपणे (कारण ´तावातावाने´ हे “ती” च्या स्वभावात बसत नव्हतं) म्हणत तिने फोन कट करून पर्समध्ये ठेवला. ती. वय वर्ष २९. उंची पाच फूट, […]

Read more "ओळख"

खपली

“इट वॉझ एन ऍव्हरेज परफॉर्मन्स” “कसा होता माझा शॉट?” तिच्या ह्या प्रश्नाला डायरेक्टरने दिलेलं उत्तर. तिच्या कानात घुमत राहिलं. रादर तो शब्द “ऍव्हरेज”. घुमत राहिला. खुपत राहिला. तिने स्टुडिओच्या बाहेर येऊन सिगरेट शिलगावली. झुरके घेताना तो सीन, (पडद्यावरचा नाही तर तिच्या आयुष्यातला) तिच्या डोळ्यासमोर रिवाइंड झाला. तो डायरेक्टर आणि ती एकमेकांना डेट करत होते, तेव्हाची […]

Read more "खपली"

दिल्ली – ६

जिलेबी खाताना पोटात किती साखर जातेय, न्यूट्रीशनल व्हॅल्यू काय आहे ह्याचा विचार करायचा नसतो. असा विचार मनात येणाऱ्याने जिलेबीच्या वाटेला जायचंच नसतं. जिलेबी आवडत असेल तर ती फक्त खायची आणि ती तशीच अंतरंगात पोहोचते. तसेच काही सिनेमे. लॉजिकचा फार विचार न करता त्यामागची भावना समजून घ्यायची. डोक्यापेक्षा मनाने पाहायचे. आणि ते जमत असेल तर त्या […]

Read more "दिल्ली – ६"

पुणे डायरीज – क्रमांक २

साल – २००९ “वटवृक्षाच्या शीतल छायेत अनेक पांथस्थ येतात त्याची वटवृक्षाला काय कल्पना?” (धन्यवाद, पुलं) माझ्या अर्ध्या अधिक पोस्ट ज्याच्यामुळे असतात अश्या माझ्या नवऱ्याच्या हे गावी नसतं कारण ज्या भाषेतून मी लिहिते ती त्याच्या गावी नसते. असो. तर माझ्या आणि माझ्या नवऱ्याचा डेटिंगचा काळ. तो तसाही सढळ हाताने खर्च करणारा आणि त्यात प्रेमाराधनेचा (जमतंय विनाकारण […]

Read more "पुणे डायरीज – क्रमांक २"