Describe me in one word

एके दिवशी असाच एक खेळ चालू असताना ती आणि तिच्या मित्रमैत्रिणी एकमेकांना शब्दात उतरवू पाहत होते. कोणीतरी तिच्याकरिता म्हटलं “कानसेन”. ऐकल्यावर सुखावून हसली ती. मागे कोणीतरी तिला म्हणालं होतं “तू अशीच ऐकत रहा, मला खूप बोलावसं वाटतं”. तिच्या दृष्टीने तिला मिळालेली सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट. तिला आवडायचंच ऐकायला. खूप. आणि कोणाचंही. ह्याला ना वयाचा अपवाद ना स्त्रीपुरुषाचा. […]

Read more "Describe me in one word"

लक बाय चान्स (Luck by chance)

मी काही चित्रपट फार पर्सनली घेते. म्हणजे जर ते चालले नाहीत किंवा अपेक्षेप्रमाणे चालले नाहीत तर त्यात काम करणारे कलाकार, डायरेक्टर, प्रोड्युसर ह्यांना जितकं वाईट वाटलं असेल तितकं मलाही वाटतं, असं मला वाटतं (!!!). अश्या चित्रपटांपैकी एक म्हणजे “लक बाय चान्स”. २००९ सालचा, झोया अख्तरने डायरेक्ट केलेला, फरहान अख्तर, कोंकोना सेन शर्मा, ऋषी कपूर, डिम्पल […]

Read more "लक बाय चान्स (Luck by chance)"

ट्यून

शोले सिनेमा पाहिलाय?…चुकीचा प्रश्न. हिंदी सिनेमाची आवड असलेल्यांनी हा चित्रपट पाहिला नाही हे शक्यच नाही. बरं, शोले सिनेमा आठवतोय?…पुन्हा चुकीचा प्रश्न. कदाचित हा एकमेव चित्रपट असेल ज्यातल्या कलाकारांचंच नाही तर घोडीचं नाव सुद्धा लोकांना आठवतं. इतका स्मरणीय चित्रपट होता तो. एव्हरग्रीन. अमिताभ, धर्मेंद्र, संजीवकुमार, अमजद खान, हेमामालिनी, जया भादुरी असं डेडली कॉम्बिनेशन लीड रोलमध्ये. असरानी, […]

Read more "ट्यून"

चॉकलेट दिनानिमित्त…

साधारणतः ३७-३८ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यामुळे मी डोळ्यांची नाही तर फक्त कानांची साक्षीदार आहे. ऐकीव गोष्ट आहे ही. ´तो आणि ती´ ची. त्याकाळच्या त्या दोघांसाठीच्या हायलाईट्स म्हणजे १. दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, नुकतीच दिलेली कबुली आणि त्यानंतर ठरवलेली एकमेकांची भेट २. बाजारात नवीन आलेलं फाईव्ह स्टार चॉकलेट🍫 दोघांचीही घरची सांपत्तिक स्थिती बेताचीच. त्यामुळे हे नवीन चॉकलेट […]

Read more "चॉकलेट दिनानिमित्त…"

लेकिन…

बरेच ´पाहायचे´ सिनेमे सुटलेत माझे. वेळ असला, मूड असला की त्या लिस्टीतला एखादा सिनेमा उचलून पाहते. काल लेकिन पाहिला. १९९० चा सिनेमा, “यारा सिली सिली” गाण्याने गाजलेला, लतादीदीने गायलेला आणि प्रोड्युसही केलेला चित्रपट. प्रमुख कलाकार डिम्पल कपाडिया आणि विनोद खन्ना, सोबत अमजद खान आणि बीना. चित्रपटांच्या प्रिंट्स काळाच्या ओघात जास्त क्लिअर आणि चांगल्या दर्जाच्या बनत […]

Read more "लेकिन…"