तो आणि ती

“मनी वसे ते स्वप्नी दिसे” म्हणतात, पण प्रत्यक्षात स्वप्नं (कंसात प्रत्यक्षात आणि स्वप्नं हे एकमेकांच्या शेजारी बसायला तयार नव्हते, दम देऊन बसवलंय) मात्र जे मनात असतं तशीच पडतात असं नाही. बहुतांशी विचित्र/विक्षिप्त/मजेशीर/अनाकलनीय अश्या छटा घेऊनच ती येतात. मला काल रात्री एक पडलं. बऱ्याच जणांनी दिलेल्या “तो आणि ती” ला दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून असेल किंवा मनातील […]

Read more "तो आणि ती"

ती

“ती माझ्यात आहे. ती तिच्यात आहे. ती त्याच्यात आहे. ती सगळ्यांत आहे.” ती शेवटचा अनुस्वार देते, चारोळ्यांवरून एक नजर फिरवून, लिहिलेलं पान वहीतून फाडून, चुरगळून खाली फेकते. तो बोळा लादीवर इतर चार बोळ्यांबरोबर निमूटपणे जाऊन बसतो. खिडकीतून हवेची एक झुळूक येते आणि ते बोळे हलकेच हलतात. त्यांच्याकडे तिची नजर जाते आणि मग खिडकीबाहेर. झाडेही हवेबरोबर […]

Read more "ती"

पावती

काल लोकल ट्रेनने हॅनोव्हर मेन स्टेशनला जात असताना आमच्या मागून कुणीतरी ढेकर दिला (कंसात ढेकरच्या लिंगाबद्दल मी साशंक आहे. त्यामुळे वाऱ्याच्या हळुवार झुळुकेसारखी असली तर ती ढेकर आणि रिक्टर स्केलवर मोजता येईल एवढा आवाज आला की तो ढेकर, असं मानून चालूया). त्या हिशेबाने हा ढेकर ´तो´च होता. हिंगाचा दर्प सातपुडा पर्वतापासून माझ्या नाकपुड्यांपर्यंत येऊन पोहोचला. माझ्यातला […]

Read more "पावती"

लाईन

साल 2008. स्थळ पुणे. माझी आणि माझ्या नवऱ्याची ओळख आणि मैत्री व्हायचं ते साल. एक मुंबईकर आणि एक केरळकर पुण्यात भेटतात काय आणि प्रेमात पडतात काय. वर बसलेला कुठे आणि कश्या भेटी घडवेल आणि गाठी मारेल त्याचा नेम नाही. तर, आम्ही एकाच क्युबिकल मध्ये बसायचो. त्यामुळे ओळख झाली. दोघांचा स्वभाव भलताच विनोदी (कंसात म्हणून पुरून उरतो एकमेकांना), त्यामुळे […]

Read more "लाईन"

वॉलकथा

एक माणूस होता. (कंसात होता म्हणजे अजूनही आहे. पण ही त्याच्या भूतकाळातली गोष्ट म्हणून गेलाबाजार ´होता´ वेग्रे येणार.). त्याचं एक फेसबुक अकाउंट होतं. तो बऱ्याच लोकांना फॉलो करायचा. त्यांच्या वॉलवरच्या छान छान पोस्टींची चोरी करून, आपल्या वॉलवर टाकायचा. व्हॉट्सऍपवर टाकायचा. त्याचे फेसबुकवरचे एक मित्र होते, नारळमुनी. नारळमुनींची तो ज्यांच्या पोस्ट्स चोरतो त्यांच्याशी पण मैत्री होती. त्याच्या […]

Read more "वॉलकथा"

पुणे डायरीज

माझ्या फेसबुकीय कुजकटपण्याने भारावून जाऊन एका मित्राने आज एका पोस्टवर कमेंट टाकली “आर यु रियली अ मुंबईकर? किती दिवस होतीस पुण्यात?”. एखादा पुणेकर जेव्हा तुम्हाला असं विचारतो, तेव्हा “have I made it large?” ह्या प्रश्नाचे उत्तर रॉयल स्टॅगरूपी तुमच्याकडे असते. “येस, आय हॅव नॉट ओन्ली मेड इट लार्ज बट ऑल्सो पटियाला”. त्याच्या प्रश्नाने आणि माझ्या […]

Read more "पुणे डायरीज"

नाटक

संध्याकाळचे वाजतात सात एक नाटक रंगते घरात पात्रपरिचय: श्रीयुत बेफिकीर आणि श्रीमतीला सतत फिकीर मनमौजी ऑफिसमधून परत येतो आणि आपल्याच धुंदीत वावरतो मोजे वाट्टेल तिथे भिरकावतो खिडक्या सताड उघडतो ओला टॉवेल बिछान्यावर फेकतो नाटकाचा पडदा तोच उघडतो पहिला प्रेक्षक आत येतो जाऊन तिला कानमंत्र देतो तो डास डेफिनेटली मेल असतो तिला चावून पळत सुटतो किचनमधून […]

Read more "नाटक"

लढा

तिनं दार उघडताच त्याचा गार स्पर्श अपराधीपणा देऊन गेला. “मला विसरलीस ना?” असं काहीतरी मूक बोलून गेला. खाली मान घालून तिनेही “होय” म्हणून अपराध कबूल केला. “गडबडीत होते” असं काहीतरी कारण द्यायचा निष्फळ प्रयत्नही केला. “आता पुढे काय?” कारणाकडे दुर्लक्ष करून त्याने मुद्द्यालाच हात घातला. कालपरवाचा तो आपलं अस्तित्व जपण्यासाठी हट्टालाच पेटून उठला. मीठ, मोहरी, […]

Read more "लढा"

व्यसनमुक्ती

डिस्क्लेमर: ह्या पोस्टचा हेतू कोणाच्याही धार्मिक, जातीय किंवा फेसबुकीय भावना दुखावण्याचा नाही, ही पोस्टनिर्मिती निव्वळ आणि निव्वळ कर्मण्युकीवाधिकारस्ते (कंसात करमणुकीकरिता) आहे. त्याचं नाव, नाव नको. नाही, नावात काय आहे असं नाही म्हणणार, नावात बरंच काही आहे, पण विषय पाहता नावाबद्दलची गोपनीयता पाळावी हेच रास्त. आपण त्याला गणितातल्याप्रमाणे एक्स म्हणूयात. तर हा एक्स मूळचा पुण्याचा. नोकरीनिमित्त […]

Read more "व्यसनमुक्ती"

कळप

आधी एकेक माणूस येतो नंतर तो कळप घडवतो मध्ये कुठेतरी अदलाबदली होते सध्या कळप माणसं घडवतो “मला ते खेळायला घेत नाहीत” चिमुकली रडत असते कळपात रहायची ओढ माणसाला लहानपणापासूनच असते “पीयर प्रेशर” कल्पना नाही, सत्य आहे. दारू, सिगारेटीचे पुष्ट मार्केट दर्शवते, त्यात तथ्य आहे एक राजबिंडा राजहंस म्हणतो “मला कुरूप बदक व्हायचंय” कोणी म्हणतं “काहीतरीच […]

Read more "कळप"