द्वंद्व

द्वंद्व. मला ह्या शब्दाची कमाल वाटते. इन मिन तीन, नाही दोनच अक्षरांचा शब्द आणि दोन्ही जोडाक्षरं. जरा पॉझ घेऊन दातांमध्ये जीभ अडकवून उच्चार करावा तितक्यात शब्द उच्चारून संपतो देखील. हे म्हणजे 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑन युअर मार्क, गेट सेट गो म्हणून पोझिशन घ्यायची आणि 50 मीटर मधेच शर्यत संपायची. निदान आणखीन एक ´व´ पुढे […]

Read more "द्वंद्व"

भिनणे

जर्मनीत बरेचजण कुत्रे पाळतात. खूप लाड करतात त्यांचे. अगदी स्वतःच्या मुलांवरही आपल्या कुत्र्याइतकंच प्रेम करतात. आणखीन एक गोष्ट ते  आवर्जून पाळतात. ते म्हणजे नियम, विशेषकरून वाहतुकीचे. हेच ते विनोदाचं टायमिंग. पुणे/बंगलोर मधल्या लोकांमध्ये ह्याच लाईनवर नक्की हशा पिकणार. वाहतुकीचे नियम काय पाळायची गोष्ट आहे? वेळ बहुमोल असतो, पण तो फक्त आपला, ह्या विचाराधीन असलेले बाईकस्वार […]

Read more "भिनणे"

स्टाईल

(कथा स्मोकिंगच्या संदर्भात असल्याकारणाने “वैधानिक चेतावणी” द्यायचा विचार करत होते. पण जर तुम्ही स्मोकत असाल तर, स्वतःच्या आईबापाच्या, बहिणभावाच्या, मित्रमैत्रिणींच्या, गर्ल्फ़्रेंड-बॉयफ्रेंडच्या, नवरा-बायकोच्या, मुलांच्या, पाळलेल्या कुत्रा-मांजरीच्या सांगण्याने जर सोडत नसाल तर माझ्या चेतावणीला थोडीच भीक घालणार आहात? आणि स्मोकत नसाल तर ह्या लेखाने प्रेरित होऊन थोडीच स्मोकायला लागणार आहात? तरीसुद्धा लिहितेय, स्मोकणे हे आरोग्यास खरंच हानिकारक […]

Read more "स्टाईल"

स्टोरी

चर्चगेट स्टेशन. मध्यरात्री एकची वेळ. सनी पळतपळत सुटलेली ट्रेन पकडतो. धापा टाकत खांबाला पकडून दारात उभा राहतो.  इंजिनीयरिंगची शेवटची परीक्षा देऊन महिना होत आलेला असतो. कॅम्पसमधून मिळालेला जॉब सुरु व्हायला अजून 5 महिने अवकाश. त्याची इच्छा काहीतरी ऍडव्हेंचरस करायची असते. जर्नलिझम मध्ये रस असतो. पण घरच्यांच्या इच्छेखातर तो इंजिनीयर होतो. जॉबचे ऑफर लेटर हाती पडताच […]

Read more "स्टोरी"

मोह

त्याच्या डोळ्यातली अधीरता तिच्यापासून लपलेली नसते. तिची मानसिकता कदाचित त्यालाही समजते. मग सुरु होतो एक मूक संवाद.   ती: “नको रे” तो: “का नको?” ती: “तुला माहितीये का ते” तो: “म्हणजे नेहमीचंच तुझं” ती: “आणि तुझंही” तो: “आहेच मी असा मुळी” ती: “आज नको. उद्या पाहूया” तो: “आज का नको?” ती: “का…कारण मी तयार नाहीये […]

Read more "मोह"

निर्णय

सकाळी सात वाजता तिला जाग येते. आकाशात मळभ भरून आलेलं असतं. खिडकीतून येणारी हवाही कुंद. ती दीर्घ श्वास घेते. नेहमीच्या सवयीप्रमाणे “कराग्रे वसते लक्ष्मी…” श्लोक म्हणत डोळ्यांवर हात फिरवते. दिवसाची सुरुवात होते. तल्लफ आणि सवय दोघींमुळे तिचा मोर्चा किचनकडे वळतो. चहा टाकते आणि रेडिओ ऑन करते. कुठलीतरी जाहिरात सुरु असते. तिचं लक्ष भिंतीवरल्या दिनदर्शिकेकडे जातं. […]

Read more "निर्णय"

मेडिटेशन

अंथरलेल्या चटईवर, मी पद्मासनस्थ होते, मग दीर्घ श्वास ओढून ध्यानस्थ होते. मन विचाररहित करायचं म्हणून फोकस करते, विचलित व्हायचं नाही म्हणून डोळे बंद करते. बंद डोळ्यांसमोर उघडतं विचारांचं फिशमार्केट, “काय आहे जरा पाहूया” येते आतून कमेंट. “शSSS फोकस कर” मी मनाला दरडावते, मन उत्तरादेखील बहिणाबाईंची कविता ऐकवते. वढाय मन मार्केटचे दार उघडते, प्रत्येक कोळीण “इथे […]

Read more "मेडिटेशन"

सकाळ

जशी सगळ्यांना आवडते, तशी मलाही शाळा खूप आवडायची. त्यामुळे शाळेत जायचा कधी कंटाळा आला नाही. पण जेव्हा सकाळची शाळा असायची तेव्हा उठायला मात्र जीवावर यायचं. खासकरून थंडीच्या दिवसांत. त्या दरम्यान आमच्या घरचा पहाटेचा एक टिपिकल सीन. पहाटे साडेपाचची वेळ. आजीच्या साडीच्या गोधडीत एक गधडी झोपलेली असते. पांघरुण चारीही बाजुंनी छान पांघरलेलं आणि अंगाखाली व्यवस्थित खोचलेलं […]

Read more "सकाळ"

कॉम्बिनेशन

काहीवेळा भिन्न गोष्टी एकत्र येऊन धमाल कॉम्बिनेशन घडवतात. म्हणजे बघा, तेंडुलकर हे महाराष्ट्रातलं एक कॉमन आडनाव. आणि त्याहूनही कॉमन असं सचिन हे अख्ख्या भारतात आढळणारं नाव. पण दोघे एकत्र येतात आणि क्रिकेटचा बॅटमॅन बनतो. अमिताभ, धर्मेंद्र, संजीवकुमार आणि अमजद खान एकत्र येतात आणि शोले बनतो. चुलत, मावस, आतेभावंडं आणि पत्त्यांचा कॅट एकत्र येतात आणि सकाळपासून […]

Read more "कॉम्बिनेशन"

लिफ्ट करादे

“लहानपण देगा देवा, आज तरी मिळू दे डेकवाली रिक्षा.” रम्य ते बालपण आणि त्यावेळची आकर्षणं. शाळेपासून ते घरापर्यंत जेमतेम 5 मिनिटांचा रिक्षाचा प्रवास. एखादं गाणं ऐकून होईल एवढाच वेळ. पण डेकवाली रिक्षा हवी म्हणून कधीकधी शाळेपासून ते घरापर्यंतचा अर्धा रस्ता मी आणि माझ्या मैत्रिणी चालत गेलोय. असंच आणखी एक आकर्षण म्हणजे लिफ्टवाली बिल्डिंग. त्यावेळी बोरिवलीत […]

Read more "लिफ्ट करादे"